शारदीय नवरात्र २०२५ - दिवस तिसरा

Go to content

शारदीय नवरात्र २०२५ - दिवस तिसरा

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
Published by Suhas Joshi in Festivals in Mahalaxmi temple Kolhapur · Wednesday 24 Sep 2025
Tags: NavaratriUtsavatAmbabaiMahalaxmiTemple
श्रीमाता ||

अश्विन शु. तृतीया, बुधवार
दिनांक २४ सप्टेंबर २०२५ पूजा क्रमांक ३ । महाविद्या क्र. २ || महाविद्या श्रीतारा (तारिणी) माता ||

ध्यान -
प्रत्यालीढ पदार्पितांघ्रिशवहत् घोराट्टहासां पराम् ।
खड्गेंदीवर कर्तु खर्पर भुजां हुंकारबीजोद्भवाम् ।
खाँ नील विशाल पिंगल जटाजुटैक नागैर्युताम् ।
जाडयं न्यस्त कपालके त्रिजगतां हंत्युग्रतारा स्वयम् ||

स्वरूप -
श्रीतारा मातेचा डावा पाय शवावर असून, ही भयानक हास्य करीत आहे. हिच्या चार हातात खड्ग, नीलकमळ, कात्री व खप्पर असून, हिचा जटालाप पिंगट छटेचा असून तो नागयुगुलांनी युक्त आहे. मुंडमाला धारण करणारी, सर्व जडत्व, नैराश्य, दारिद्र्य खप्परात खेचणारी ही दिव्य देवता आहे.
ही दशमहाविद्यालयातील द्वितीय देवता असून, कालीकुलातील पूर्वाम्नायपीठ देवता आहे. चैत्रशुद्ध नवमीला हिची उत्त्पती झाली. हिचा भैरव अक्षोभ्यरुद्र आहे.

इतिहास -
मेरूपर्वताच्या पश्चिमेस चोलना नदीकाठी ही प्रगट झाली. वसिष्ठांनी हिची विशेष उपासना सिद्धी केली.

उपासना भेद -
स्पर्शतारा, चिंतामणीतारा, सिद्धिजटा, उग्रतारा, हंसतारा, निर्वाणतारा, महानीला इ. अनेक हिची रूपे व उपासना भेद आहेत.

फल -
हिच्या उपासनेने सर्वज्ञत्व, संसृतिनाश, मोक्षलाभ, सर्वासिद्धीप्राप्ती, शत्रुनाश, सकल भोग-सुख प्राप्ती इ. अनेक फललाभ होते.

आजची पूजा - श्रीपुजक रामप्रसाद ठाणेकर  सचिन ठाणेकर,  अमित देशपांडे व निखिल शानभाग यांनी बांधली.

आधार लेखन -
वेदमूर्ती सुहास जोशी गुरुजी, कोल्हापूर.


Back to content