चला पंचगंगा तिरी...

Go to content

चला पंचगंगा तिरी...

Mahalaxmi Temple Kolhapur | Official Site of Ambabai devotees spread all over the world
Published by Sudhakar Kashid in History of Kolhapur · Thursday 02 Oct 2025
Tags: ShahiDasaraofKolhapur
चला पंचगंगा तिरी...
सुधाकर काशीद, तरुण भारत.

कोल्हापुरात दसरा सोहळा आज उत्साहाने साजरा झाला. दसरा चौकात सोने लुटण्याचा पारंपारिक विधी शाहू छत्रपती, संभाजी राजे, मालोजी राजे, शहाजीराजे, व यशराजराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पण या सोहळ्यानंतर रात्री आणखी एक सोहळा पंचगंगा नदीच्या काठावरील समाधी मंदिर परिसरात झाला.

तत्पूर्वी अंबाबाईची पालखी सिद्धार्थ नगरातून जुना बुधवार पेठ, तोरस्कर चौक मार्गे पंचगंगा नदीवर आली. सिद्धार्थ नगरात तेथील रहिवाशांनी पालखीचे स्वागत फुलाच्या पायघड्या , रांगोळी घालून फुलांची उधळण करून आणि प्रत्येक दरवाजात ओवाळणी करून केले.

त्यानंतर अंबाबाईची पालखी पंचगंगा तीरावर आली. पाठोपाठ गुरु महाराज यांची पालखी व रंकभैरवाचीही पालखी या ठिकाणी आली. समाधी मंदिर परिसरातील दगडी ओट्यावर या पालख्या ठेवण्यात आल्या. या आवारात करवीर संस्थानातील पूर्वजांच्या स्मृती म्हणून मंदिरे, दगडी ओटे, तुळशी वृंदावनांची खूप वर्षापासून उभारणी करण्यात आलेली आहे. तारकेश्वर मंदिर आहे. एरव्ही पंचगंगेच्या घाटावर असंख्य कोल्हापूरकर येतात.  पण या समाधी स्थळाला सगळेच भेट देतात असे नाही. आज येथे धार्मिक विधी झाले. या ठिकाणी करवीर संस्थानचे छत्रपती, शंभु छत्रपती, शंकराचार्य व गुरु महाराजांची समाधी आहे. त्यातला धार्मिक भाग सर्वांनाच पटत असेल असे नाही. पण पटो अथवा न पटो पंचगंगेच्या तीरावरील ही दगडी मंदिरे रचनेच्या अंगाने कशी आहेत, त्याची बांधणी कशी आहे, दगडी ओटे, दीपस्तंभ कसे आहेत... आवारातील जुने वृक्ष त्यांचे दगडी पार व रात्रीचे तेथील वातावरण खूप वेगळे आहे. होय, तेथे एक तालीमही आहे. ते पाहण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी जायला काय हरकत आहे?

-
सुधाकर काशीद
तरुण भारत, कोल्हापूर.



Back to content