Rankala Lake - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content
Rankala lake

An inspiration and marine drive of Kolhapur, Rankala lake is always crowded by tourists or local public. A kilometer away from the famous Mahalaxmi (Ambabai) temple, this area was formerly a separate colony. The mine stone of this region was used to build the Mahalaxmi (Ambabai) temple and another 360 Jain temples in the vicinity of Kolhapur by king Gandaraditya. Documental evidences can be found till today.

After an earthquake, these mines were full of water and Rankala lake came to an existence. Spread in 202 hectors, this lake is 10 meters deep. The road around this lake measures 4 kilometers. At the east end, Sandhyamath – a stone construction situated in water of the lake and at the west end, Shalini Palace a picturesque building adds beauty to this lake.

Rankbhairav was a faithful god of Mahalaxmi. His name has been given to this lake. Walking straight from the southern gate of the Mahalaxmi temple, there exists a temple of Rankbhairav. Rankbhairav is a guard of Kolhapur. In Kollhapur region, instead of Yama, the goddess has blessed Rankbhairav to take all the decisions after death.
रंकाळा तलाव

कोल्हापुरचा श्‍वास, कोल्हापुरचे मरीन ड्राईव्ह...रंकाळा तलाव. रंकाळा तलाव सदासर्वदा पर्यटक व स्थानिक नागरिकांनी गजबजलेला असतो. प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरापासून दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रंकाळा तलावाच्या परिसरात पूर्वी स्वतंत्र वसाहत होती. याच परिसरातील खाणींचे दगड महालक्ष्मी मंदीर व राजा गंडरादित्याने कोल्हापुर परीसरात बांधलेल्या 360 जैन मंदीरांच्या बांधकामासाठी वापरले गेल्याचे पुरावे आहेत. कालांतराने घडलेल्या भूकंपामुळे खाणींचा हा भाग पाण्याने व्यापून गेला व रंकाळा तलावाची निर्मिती झाली.

सुमारे 202 हेक्टर क्षेत्र असलेल्या रंकाळ्याची खोली 10 मीटरपेक्षा जास्त आहे. भोवताली असलेला रस्ता सुमारे साडे चार किलोमीटर अंतर मापतो. रंकाळ्याच्या पूर्वेस पाण्यामध्ये संध्यामठ नावाची अत्यंत विलोभनीय वास्तू उभी आहे. दूर पश्‍चिम किनार्‍यावर उभा असलेला शालिनी पॅलेस रंकाळ्याच्या सौंदर्यात भरच टाकतो.

रंकभैरव या श्री महालक्ष्मीच्या मर्जीतील देवाचे नाव या तलावाला देण्यात आलेले आहे. महालक्ष्मी मंदीराच्या दक्षिण दरवाजाने सरळ चालत गेले असता दोनच मिनिटांवर जिथे रस्ता संपतो तिथे रंकभैरवाचे मंदीर आहे. हा रंकभैरव म्हणजे करवीरचा कोतवाल. कोल्हापूर क्षेत्रीचा सर्व कार्यभाग निर्णय यमाऐवजी रंकभैरवाने करावा असे त्याला देवीकडून वरदान आहे.
Coordinates
16.6905° N, 74.2106° E
Google Map
Opening time24 hours
Closing timeN.A.
Governed by
Kolhapur Municipal Corporation
Contact number0231 2641970
Website--
Entry feesN.A.
Back to content