Old Palace - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content
2) Old palace

When we walk out of the eastern or southern gate of the temple, we can see a historical structure; this is a Juna Ralwada or an old palace. This building is a former residence of Chhatrapatis of Karveer Sansthan. The court of Chhatrapatis assembled here. The Picturesque design of this palace is an excellent example Maratha architecture. In this premise, a temple of Shri Tuljabhavani (the family goddess of Chatrapati) is located. During historical days, the Darbar or court of Chhatrapatis regularly gathered in front of the goddess Tuljabhavani. Today, a bison, a tiger, a deer hunted by Chhatrapatis are preserved here. Beloved of all, the throne of Chhatrapatis and a life size wooden statue of Chhatrapati Shahu Maharaj has been kept here. All major administrative offices were in these premises. Today, some schools, colleges & government offices are in these premises.

In the revolt of 1857, many revolutionaries sacrificed their lives here. This revolt happened under the leadership of Chhatrapati Chimasaheb. Numerous glorious memories from pre and post independence are cherished by this building.
2) जुना राजवाडा

महालक्ष्मी मंदिराच्या पूर्वेस, पूर्व दरवाजा आणि दक्षिण दरवाजा इथून बाहेर आल्यावर समोरच एक पुरातन बांधकाम दिसते. हाच जुना राजवाडा. ही वास्तू म्हणजे करवीर छत्रपतींचे पूर्वीचे निवासस्थान. याच परिसरात दरबारदेखील भरत असे. अत्यंत विलोभनिय अशा जुन्या राजवाड्याची रचना म्हणजे मराठी स्थापत्यकलेचा एक अद्भूत नमुनाच आहे. याच परिसरात राजवाड्यामध्ये करवीर छत्रपतींची कुलदेवता श्री भवानीदेवीची स्थापना केलेली आहे. इथे श्री भवानीदेवीच्या समोर असलेल्या भवानी चौकातच पूर्वी राजदरबार भरत असे. आता या ठिकाणी राजांनी शिकार केलेले गवारेडा, वाघ, सांबर इ. भुसा भरून ठेवण्यात आले आहेत. तमाम हिंदुंना वंदनीय असलेले छत्रपतींचे सिंहासन व छत्रपती शाहूरायांचा पूर्णाकृती लाकडी पुतळा या भागात ठेवलेले आहेत. राजवाड्याच्या परिसरात पूर्वी संस्थानची कार्यालये होती. आता तिथे शाळा, कॉलेज व विविध शासकीय कार्यालये आहेत.

इ. स. 1857 मध्ये झालेल्या उठावात ब्रिटिश सत्तेविरूद्ध बंड पुकारून क्रांती करताना अनेकांनी याच परिसरात बलिदान दिले आहे. हा उठाव छत्रपती चिमासाहेब महाराजांच्या नेतृत्वाखाली झाला. समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या वास्तूने स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या अनेक स्मृती जपल्या आहेत.
Coordinates
16.6944° N, 74.2241° E
Google Map
Opening time6.00 am
Closing time08.30 pm
Governed by
The Royal Family of Kolhapur
Contact number
0231 2542835
Website
--
Entry feesN.A.
Back to content